Shri Chaitanyeshwar Shikshan Mandal, Nagpur
Affiliated to RTM Nagpur University, Nagpur, Recognized by State Government NAAC Accredited Institution
NSS Best College Awarded by RTM Nagpur University in 2007
अगदी अल्प विद्यार्थी संस्थेत सुरु करण्यात आलेल्या ह्या महाविद्यालयात सध्या स्थितीत ४५० विद्याथी कला शाखेत शिक्षा घेत आहेत. 'मराठी वाड्मय' हा विषय जोडल्या गेल्याने व नंतरच्या काळात इतिहास हा विषय समाविष्ट केल्यामुळे अर्थशास्त्र हा विषय ऐच्छिक विषय झाला. तरीही विद्यार्थांची आवड बघता अर्थशास्त्र विषयात प्रवेश येणाऱ्याची संख्या गेल्या २५ वर्षात कमी झालेली नाही.
विद्यार्थ्यांना विषयाचे आकलन योग्य प्रकारे होण्याकरिता त्यांच्या भाषेत विविध उदाहरणाच्या सहाय्याने विषय मांडण्याचा प्रयत्न केला जातो. योग्य उत्तरे योग्य प्रकारे लिहिता यावी त्याकरिता घटक चाचणी प्रथम संत्रात परीक्षा असे उपक्रम राबविण्यात येतात. त्यामुळे विद्यापीठ निकालाची टक्केवारी योग्य प्रकारे राखता येते.
विद्यार्थ्यांना हा विषयातील सखोल ज्ञान देण्याच्या दृष्टीने अंदाजपत्रक म्हणजे काय, करप्रणाली, अधिकोषाचे व्यवहार,शेतमालाचे विपणन म्हणजेच खरेदी विक्री यांची स्थळांना भेटी देऊन व प्रत्यक्ष वर्तमान पत्रातील तज्ज्ञ व्यक्तीचे लेखाचे सामुहिक वाचन करून दिली जाते. मागील २५ वर्षाच्या काळात जवळ-जवळ ४९ विद्यार्थी ह्या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेवून वेगवेगळ्या क्षेत्रात नौकरी निमित्त पर्दापण केले आहे. व उर्वरित विद्यर्थी शेती व व्यापार क्षेत्रात प्रगती करीत आहे.