Department Of Sociology

श्री. लेमदेव पाटील कला महाविद्यालयाचे स्थापनेपासून समाजशास्र विभागाद्वारे समाजशास्र विषयाचे बीए भाग प्रथम, द्वितीय, तृतीय वर्गातील विद्यार्थ्यांना नियमितपणे अद्यापनाचे कार्य केले जात आहे.

उपरोक्त विषयाच्या अभ्यासक्रमाअंतर्गत समाजोपयोगी शिक्षणाबरोबरच समाज शास्त्रत्न, विचारवंत यांनी प्रतिपादित केलेल्या सिद्धांताद्वारे विविध सामाजिक आशयाची उकल आणि ओळख विद्यार्थ्यांना करून दिली जाते. जसे : ऑगष्ट कोम्ठ, कार्ल मार्क्स, दरखिम, घुर्य समाजशास्त्रीय विचारवंतांनी मांडलेल्या सिद्धांताद्वारे सामाजिक समस्या, सामाजिक समायोजन, सामाजिक नियोजन, सामाजिक स्तरीकरण, वर्गीकरण, सामाजिक गतिशीलता, सामाजिक विषमता, सामाजिकरण, नागरीकरण इत्यादी पासून तर संस्कृती, सामाजिक नियमने, मुल्ये, प्रमाणके, प्रथा, परंपरा, ग्रामीण व नागरी जीवनामधील आव्हाने, अशा अनेक सामाजिक पैलूंची ओळख करून दिली जाते. त्यामुळे कला शाखेतील ८० ते ९० विद्यार्थी समाजशास्त्र विषयाला प्रवेश घेतात आणि आवडीने अध्ययन करतात.

 समाजशास्त्र, विभागाद्वारे अध्यापनाच्या कार्याबरोबरच समाजातील (ग्रामीण) हुंदाप्रथा, व्यसनाधीनता, निरक्षरता, अंधविशवास अशा अनेक सामाजिक समस्या विरुद्ध निरनिराळ्या गावांतून महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या पथनाट्याद्वारे समाज प्रबोधन, गणपती उत्सव, शारदा उत्सवादरम्यान केले जाते.


Faculty Of Sociology

Name: Shubhangi Juwar
Qualification: M.A.
Designation: Assistant Professor (CHB)
Contact No: 9405913178
Email-Id: sijuwar@gmail.com
Shubhangi Juwar